फैजपूर (महाराष्ट्र उपसंपादक पुरुषोत्तमदास बोंडे) : येथील तापी परिसर विद्या मंडळ संस्थेच्या २०२१-२६ पंचवार्षीक : निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आ. शिरीष चौधरी यांनी निवडणूक अधिकारी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्याकडे पात्र उमेदवारांची निवड यादी दिल्यानंतर वैध उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली.
वैध निवड झालेल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा २६ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. तापी परिसर विद्या मंडळ संस्थेच्या पुढील पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यात पात्र उमेदवारांनी अर्ज भरले होते. १९ सप्टेंबर रोजी सर्व सभासदांनी माघारीचे अर्ज आ. शिरीष चौधरी यांच्याकडे सोपविले होते. आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर आ. शिरीष चौधरी यांनी निवडणूक अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील यांच्याकडे अर्ज दाखल केला नंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैध उमेदवारांची निवड यादी घोषित केली आहे.
या वैध उमेदवारी ची अधिकृत घोषणा २६ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. यात अध्यक्षपदी आ. शिरीष चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के. चौधरी व नगरसेवक मिलींद शंकरराव वाघुळदे, चेअरमन माजी पं.स. उपसभापती लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हा.चेअरमन प्रा. किशोर चौधरी, सचिव प्रा. मुरलीधर फिरके, सहसचिव प्रा. नंदकुमार भंगाळे यांच्यासह नियामक मंडळ सदस्य याप्रमाणे वैध उमेदवारांची निवड यादी घोषित करण्यात आली.






