चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सेवा समर्पण अभियानांतर्गत आज (दि २०)भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीणच्या वतीने विरवाडे येथे वृक्षारोपण अभियान संपन्न झाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन, उपस्थितांना मोदी सरकारच्या विविध योजना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दती व कुशल नेतृत्वाबद्दल सांगण्यात आले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी पं स सभापती आत्माराम् म्हाळके जिल्हा परिषद सभापती उज्वला ताई म्हाळके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील चोपड़ा शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल पं स उपसभापती भुषण भिल सरचिटणीस हनुमंत महाजन सरचिटणीस चंद्रकांत धनगर शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य पिंटू पावरा बुथ सहयोजक विजय बाविस्कर बापुराव पाटील प्रशांत म्हाळके विरवाडे चे सरपंच विशाल म्हाळके आडगाव चे सरपंच रावसाहेब पाटील गजानन शेखर ठाकरे कोळी विरवाडे ग्रामपंचायत उपसरपंच लता बाई भिल सदस्य आबा भिल दिलीप म्हाळके अशोक पाटील श्यामसिंग भिल बनाबाई पावरा पिंटू बेलदार सुनिल कोळी विजय न्हावी प्रतिप कोळी प्रवीण भिल नाना कोळी राजेंद्र पाटील चेतन पाटील अॅप प्रमुख धर्मदास पाटील यांच्यासह असंख्य भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते






