मोती साबण जाहिरातीतील अलार्म काका विद्याधर करमरकर यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ या जाहिरातीमधील अलार्म काका आणि चित्रपट व नाटय़ सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते.

मराठी मनोरंजन विश्वामध्ये करमरकर यांना आबा म्हणून ओळखले जायचे. केवळ मराठीच नाहीतर हिंदीतील काही चित्रपट आणि जाहिरांतीमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

करमरकर यांनी आतापर्यंत ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’, ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक सिनेमांत भूमिका साकारल्या. विद्याधर करमरकर यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ते विलेपार्ले या ठिकाणी राहत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here