पोहना ते वेणी पुलावरील पुलाची दुर्दशा : शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास

हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : हिंगणघाट हायवे नं. ७ ला लागून असलेला पोहना – वेणी – शेकापूर येथील रस्त्यावर खड्डे पडले असून, येथील पुलावरील रस्त्याचे कामही अद्याप झालेले नसल्याने, मोठमोठे खड्डे पडले आहे. आता या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने, यावरून पायी चालणेदेखील धोकादायक झाले आहे. पोहनाजवळच असलेल्या बाजारपेठेत जाण्यासाठी ग्रामस्थ याच रस्त्याचा वापर करत असतात.

रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ग्रामस्थांना येण्या-जाण्यासाठी रोड तर नाहीच सोबतच गावानजीक असलेल्या उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्याून पाणी जात असल्याने ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून वाट शोधावी लागते.

पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे हाल होत आहेत. या रस्त्याने जातांना बैलसुद्धा आजारी पडले असून, संबंधित अधिकारी मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नाही. या खड्ड्यांमुळे साधारण पाऊस झाला तरी जगाशी या गावाचा संपर्क तुटून जातो.

pohana-bridge

पोहना – वेणी – शेकापूर – धानोरा – माढेंळी येथील शेतकऱ्याचे कापूस तूर सोयाबीन नेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनाही खूप त्रास सहन करत आपली वाट शोधावी लागते. गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याचे कामच झालेले नाही. पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठे वाहन या पुलावरुन जाऊ शकत नाही. या संपूर्ण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसामुळे पाणी साचून राहते

या रस्त्याकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वेणी, जागोना, पोहना येथील शेतकऱ्यांतर्फे अमोल राऊत , अमर मेसरे , जगदीश घुघरे ,अशोक साथघरे, टापरे , वेणी चे सरपंच अमोल दुरतकर , राहुल दुरतकर ,प्रकाश देशमुख, अशोक तोपलमोडे, लोंनबळे व ग्रामस्थाकडून मागणी होत आहे.

road-under-water-at-pohana-hinganghat

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here