जयपूर (राजस्थान) : येथील नामांकित हॉटेलमध्ये बर्गर खाण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपल्या जिभेचे चोचले पुरवितांना रुग्णालयाचा मार्ग धरावा लागला आहे. त्याने ऑर्डर केलेल्या बर्गरमध्ये चक्क मेलेला विंचू आढळल्याने या तरुणाची प्रकृती बिघडली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एका तरुणाने या हॉटेल मध्ये बर्गरची ऑर्डर दिली होती. बर्गर आल्यानंतर त्याने जेव्हा तो खाल्ला त्यावेळी त्याला पहिल्याच घासाला काही तरी चावल्यासारखे झाले. आणि बर्गरला चवही विचित्र आल्याने त्याने अर्धा खास बाहेर काढला यावेळी त्याने उरलेला बर्गर उघडून पाहिल्यावर त्यात मेलेला विंचू असल्याचं दिसून आलं.
याबाबत त्याने हॉटेलच्या स्टाफला सांगितले असता त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त न करता त्या तरुणावर आणि त्याच्या मित्रावर दादागिरी करत त्यांना धमकी दिली मात्र तरुणांनी याबाबत पोलिसानंकडे तक्रार केली. याच दरम्यान विंचू चावलेल्या तरुणाचीही अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता या संपूर्ण घटनेवर पोलिसांकडून तपास सुरु आहे.






