कोल्हापूर गणेश विसर्जनादरम्यान महाराष्ट्र राज्य पोलिस बॉईजचे कार्य कौतुकास्पद – अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : अनंत चतुर्दशी गणेश मूर्ती विसर्जनाचे पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासन,आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, तसेंच कोल्हापूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत भक्तिमय व शांततापूर्ण वातावरणात शासनाने कोरोना महामरीच्या घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत. गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले.

गणेश मूर्ती विसर्जन करताना वाहतुकीची कोंडी होऊ नये. किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जिल्हा व शहर पोलीस प्रशासन यांच्यावर अतिरिक्त ताण पडू नये यासाठी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे कोल्हापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन टीम चे प्रमुख सुनील कांबळे सर यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशानुसार, जिल्हा अध्यक्ष सतीश चव्हाण उपाध्यक्ष युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था व मूर्ती विसर्जनसाठी सहकार्य करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. kolhapur-police-boys

पोलीस बॉईज असोसिएशन चे कार्य खुपचं कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,स.पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी काढले.यावेळी पोलीस बॉईज असोसिएशन चे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष नियाज जमादार,जनार्दन चव्हाण,विजय बोराडे,दिलीप कदम,चेतना कांबळे,मयुरी सुतार,संदीप चव्हाण,संतोष गिरगावे,मोहम्मद सनदी,तौफिक नंदिवले,रत्नभूषण चौगले,मारुती सातपुते,सूरज पाटील,सुशांत नाईक,सचिन भोसले,चंद्रकांत कांबळे आणि कोल्हापूर जिल्हा टीम यांनी प्रामाणिकपणे आणि विना मोबदला कर्तव्य पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here