मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव पूर्व येथील पहाडी शाळा येथे गत तीन महिने कार्यरत असलेल्या लसीकरण केंद्रास वेद फाउंडेशन अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार यांनी भेट दिली.
याप्रसंगी लसीकरण केंद्रप्रमुख डॉक्टर तेजस पावसकर यांच्यासमवेत सुश्मित कौलकर, कोमल वाघमारे, संपदा सत्विलकर, सत्यविजय आसगोलकर, अतुल गायकवाड इत्यादी लसीकरण सहाय्यक व्यक्तींना वेद-नंदा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. गेल्या ०३ महिन्यांपूर्वी कार्यरत या लसीकरण केंद्रात हजारो व्यक्तींनी लसीकरण सुविधा प्राप्त करून घेतली असून, स्वच्छता सरकारी नियम, आणि लसीकरण केंद्रातील सर्व सहाय्यकांचे संयमी वर्तन यासमवेत कार्यकुशलता यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता तसेच गर्दी न होऊ देता लसीकरण मोहीम चालू आहे.
मध्यमवर्गीयांसाठी हक्काचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या संस्थांद्वारे सदर व्यक्तींना सन्मानित करून आपण त्यांच्या अमूल्य कार्याची अल्पशी पोचपावती देत आहोत, असे प्रतिपादन श्री स्वप्नील यांनी याप्रसंगी केले.






