वैश्विक दान दिवस प्रित्यर्थ साई परिवारद्वारा अन्नदान

मुंबई (विशेष प्रतिनिधी स्वप्निल राणी नंदकुमार) : वैश्विक दान दिवसाचे सौजन्य साधत साई परिवार द्वारा डींगेश्वर तलाव येथे विशाल अन्नदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर अन्नदान चार महिने सातत्यपूर्ण राबविण्यात येत आहे.

मुंबई उपनगरातील रासम कुटुंबीयां द्वारा चार महिने बेरोजगार कुटुंबांना अन्नदान करण्यात येत असून त्याचाच आज १२२ वा दिवस होता. श्री व सौ मनीषा मंगेश रासम यांच्यासमवेत ममता व हितेन या पारिवारिक सदस्यांसमवेत श्री वडके श्री देवळेकर श्री वाडेकर इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांचा या उपक्रमात विशेष हातभार लागला.

वैश्विक आपत्ती मधील टाळेबंदी च्या कालखंडात साई परिवाराचे सदर अन्नदान अनेक कुटुंबीयांसाठी मोलाचे वरदान ठरले. स्थानीक कोळी बांधव तथा आदिवासी आणि मागासवर्गीय बहुसंख्य बेरोजगार कुटुंबीयांसाठी सकस व पौष्टिक आहार प्राप्त होणे यासारखे मौलिक कार्य नाही असे मत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here