मुंबई (विशेष प्रतिनिधी स्वप्निल राणी नंदकुमार) : वेद फाउंडेशन द्वारा आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याची पंचाहत्तरी या काव्य उपक्रमाची सांगता गोरेगाव स्थित फाउंडेशनच्या मुख्यालयात करण्यात आली. समारोप प्रसंगी, सिने अभिनेत्री अनुजा लोकरे आणि विलास देवळेकर यांना काव्य गौरव सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या समारोप सोहळ्यात सिने अभिनेत्री अनुजा लोकरे यांनी “स्वरचित कविता” सादर करत, पहिलीच कविता आणि त्या कवितेला मिळालेला पहिला पुरस्कार ! त्यामुळे ” आनंद गगनात मावेनासा झाला आहे !!” असे आनंदोद्गार काढले. ह्या वेळी श्री देवळेकर यांनीही एक कविता सादर केली.
सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून रसिक काव्यप्रेमिनी सहभाग नोंदविला होता,ज्यात प्रामुख्याने आयकर विभाग, गुन्हे शाखा विभाग अधिकारी समवेत ज्येष्ठ सिने तारका इत्यादींचा समावेश होता. काव्यातून स्वातंत्र्याची ७५ सादर करत आपले देशप्रेम व्यक्त करणाऱ्या व संस्थेच्या उपक्रमात सहभागी होण्याऱ्या सर्वांचे आभार मानत श्री स्वप्नील राणी नंदकुमार यांनी विविध वृत्तपत्रांचे देखील प्रसिद्धी साठी आभार मानले.






