जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : शहरातील कांचन नगरात थेट घरात घुसून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दि.२३ रोजी सकाळी घडली मात्र यात एक हल्लेखोरचं हा घटनास्थळी जखमी होऊन बेशुध्द झाल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.या घटनेमुळे परिसरात खळबळ प्रचंड उडाली होती.
शहरातील कांचन नगर भागात गुरुवारी सकाळी ९ वाजता दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर गोळीबार केला. आकाशच्या भावाने गोळीबार करणाऱ्याला पकडून ठेवल्याने यात कुटुंबातील सर्वांचा जीव वाचला.
आकाशच्या करंगळीला गोळी लागली आहे. पळून जाताना हल्लेखोरांमधील एक जण पाय घसरून पडला. त्यात तो बेशुद्ध झाला. गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. आकाशवर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला हा पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते.






