एरंडोल तहसिल कार्यालयात विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध विषयांवर बैठकीचे आयोजन

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर पिंटू राजपूत) : जिल्ह्यातील एरंडोल येथे बुधवार (दि.२३) रोजी एरंडोल मतदार संघाचे मुख्यालय एरंडोल तहसिल कार्यालय येथे तहसिलदार एरंडोल यांचे दालनात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात मतदारांमध्ये जनजागृती नवीन मतदार नोंदणी , दुबार मतदारांचे नाव वगळणे तसेच गरुडा ऍप्लीकेश व मतदार हेल्प अॅप्लीकेशनच्या माहिती संदर्भात दि . १७ सप्टेंबर २०२१ रोजी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख , डीडीएसपी कॉलेज एरंडोल यांचे निवडणुक साक्षरता मंडळाचे अध्यक्ष , एरंडोल तालुक्याचे सर्व 137 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) व दि . 23 सप्टेंबर 2021 रोजी एरंडोल तालुक्यातील सर्व पत्रकार यांचे समवेत बैठक आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी कार्याक्रमाचे अध्यक्षपद श्रीमती सुचिता चव्हाण तहसिलदार एरंडोल यांनी भुषविले . एरंडोल विधानसभा मतदार संघातील व एरंडोल तालुक्यातील तमाम जनतेला एरंडोल तहसिलदार श्रीमती सुचिता चव्हाण यांचे तर्फे एका मतदाराचं नांव एकाच विधानसभा मतदार संघातील एकाच मतदार यादी मध्ये समाविष्ट असावे . अन्य विधानसभा मतदार संघात नांव नोंदविलेल्या मतदारांनी इतर मतदार संघात असलेले त्यांचे नांव तात्काळ कमी करुन घ्यावे असे अवाहन केले आहे

तसेच दि . ३० सप्टेंबर २०२१ पावेतो – नवमतदार ज्यानी वयाचे १८ वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांनी तात्काळ नांव नोंदणी करावी . यासाठी शासनाच्या https://www.nvsp.in/ या वेबसाईट वर online मतदार नोंदणी तसेच दुरुस्त्या देखील करता येणार आहेत . तसेच , Voter Help Line Application जास्तीत जास्त नागरीकांनी डाऊनलोड करुन त्यात आपला सहभाग नोंदवावा व १ जानेवारी २०२२ पर्यंत ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होईल अशा व्यक्तीने ही फॉर्म भरणे गरजेचे असल्याचे तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here