जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव शहरातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व बापूसो अँड.वसंतराव भोलाने यांचा ६४ वा वाढदिवस भारतीय जनता पार्टी,स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्था, जय गुरूदेव माध्यमिक विद्यालय, तालुका अधिकृत पत्रकार संघ यांनी मिळून मोठ्या उत्साहात साजरा केला.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि.२२) पी.आर.हायस्कुल, धरणगाव येथे सकाळी १० ते ४ दरम्यान महाआरोग्य शिबीर आयोजित करण्या आले होते. या शिबीराचे उदघाटन बापूसाहेबांचे वडील शिवदास भोलाने यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावर वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महामंडलेशवर भगवानदास महाराज,भाजपचे जेष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील,जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील,तेली समाज अध्यक्ष के.डी.चौधरी,कॉग्रेस प्रदेश सचिव डी जी पाटील साहेब,श्री.शिवदास भोलाने,राष्ट्रवादी ग्रंथालय जिल्हाध्यक्ष मोहन पाटील,डॉ.मिलिंद डहाळे,डॉ. पद्मिनी डहाळे,शिरीष बयास,ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजय महाजन,जिजाबराव पाटील,साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे,दिलीप महाजन,टोनी महाजन,अरविंद देवरे,सुशील गुजराथी,जागृतीमंचचे शिवराम पाटील,कडू महाजन,आधार चौधरी,पुनिलाल महाजन,कैलास माळी सर,आर.डी.चौधरी,राजेंद्र वाघ,पी.डी .पाटील,ग.स.चे संचालक जीवन पाटील,रतीलाल नाना चौधरी,सम्राट परिहार,महेश पवार,डॉ.प्रशांत भावे,अँड.राहुल पारेख,सुधाकर वाणी,धिरेंद्र पुरभे,दिनेश कंखरे,छोटू जाधव,अँड.महेंद्र चौधरी,आबा चौधरी इत्यादीनी मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

महाआरोग्य शिबिरात 2DECHO, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, ECGकार्डिओग्राम, मेडिसीन, मोतीबिंदू आदी तपासण्या करण्यात आल्या. या सर्व तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध होते. तपासणीनंतर गोदावरी फाउंडेशन येथे गरजूंवर उपचार व निदान पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे तरी शहरातील २८५ नागरीक बंधू भगिनींनी मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिरास डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.






