दिल्लीतील न्यायालयात गँगवॉर; गँगस्टरसह तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत न्यायालयातच गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. दिल्लीतील रोहिणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी झालेल्या गँगवॉरमध्ये कुख्यात गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगीची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यानंतर परिसरात झालेल्या गोळीबारात हल्लेखोरांनाही मारण्यात आले.

या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यात गँगस्टर जितेंद्रचा समावेश असून इतर दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी विशेष पथकाने गुरुग्राममधून अटक करण्यात आली होती. जितेंद्रवर विरोधी गँगने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हल्लेखोर वकिलाच्या वेशात न्यायालयात आले होते. त्यांनी गँगस्टर जितेंद्रवर गोळीबार केला. विशेष पथक जितेंद्रला न्यायालयात घेऊन आले होते. त्यावेळी ही घटना घडली. जितेंदर्ची हत्या त्याच्या विरोधी दिल्लीतील टिल्लू गँगने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गोळीबारात ठार झालेल्या हल्लेखोरांमध्ये ५० हजाराचे बक्षीस असलेल्या राहुलचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here