आरोग्यमंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त विद्यमानाने धरणगाव शहर काँग्रेसच्यावतीने लसीकरण मोहीम

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने धरणगाव शहर काँग्रेसच्यावतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव श्री.डी.जी.पाटीलसाहेब यांच्या संकल्पनेतून,धरणगाव येथे परीहार चौक परिसरात भव्य लसीकरण मोहीम राबविण्यात आली.लसीकरण मोहिमेला प्रभागातील व परिसरातील बंधू-भगिनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७५५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रा.सम्राट परिहार,तालुका काँग्रेस अध्यक्ष रतिलाल नाना,शहराध्यक्ष राजेंद्र नाह्यदे, माजी उपनगराध्यक्ष श्रीमती.अरुणाताई कंखरे,महिला तालुकाध्यक्ष सौ.चारूताई पाटील,संजय गांधी निराधार समिती सदस्य महेश(बंटी)पवार,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष चंदन पाटील,बापू जाधव,दीपक जाधव, शहर काँग्रेस सरचिटणीस विकास लांबोळे, मनोज कंखरे,रामचंद्र माळी, नंदा महाजन,युवक अध्यक्ष गौरव चौव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे,एडवोकेट नंदन पाटील, निखिल व रोहन नाह्यदे,आकाश बिवालसर,सागर बाजपाई,कल्पेश चौरे, भूषण लोहार, ज्ञानेश्वर मराठे तसेच दिव्यांग लसीकरण समन्वय अधिकारी आर एच पाटील, ऋषिकेश जाधवसर, राकेश पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पत्रकार बंधू उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.श्री.मयुर जैन व डॉ.पालीवाल मॅडम आणि कर्मचारी व आरोग्य सेविका यांनी लसीकरण शिबीर यशस्वी केले.तसेच प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here