चोपडा भाजपाकडून पं.दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : आज (दि.२५) शनिवार रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान स्व.पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त चोपडा भाजपाकडून कार्यालयात सकाळी १०.३० वाजता प्रतिमापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रथम त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार तालुकाध्यक्ष पंकज पाटील व सौ.संगिताताई विसपुते (ठाणे) यांच्या हस्ते घालुन वंदन करण्यात आले, सरचिटणीस हनुमंतराव महाजन यांनी पं.दीनदयाळ जीं च्या जीवनपट उपस्थितांना कथन केला,

या वेळी तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जिल्हा व्यापारी अाघाडी उपाध्यक्ष रविंद्र मराठे,सरचिटणीस हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर,सुनिल सोनगिर,भरत सोनगिरे,युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष गोपाल पाटील,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अंबादास सिसोदिया,उपाध्यक्ष मगन महाजन,सरचिटणीस राहुल पाटील, किसान मोर्चा शहराध्यक्ष भुषण महाजन,वैद्यकीय आघाडीचे डाॅ.आशिष पाटील,हिरालाल पाटील, उपाध्यक्ष हेमंत जोहरी,विनायक पाटील,जितेंद्र चौधरी,लक्ष्मण पाटील,बापूराव पाटील,सुभाष पाटील,अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष संजय श्रावगी,आर्थिक आघाडी तालुकाध्यक्ष नितिन राजपूत,कोषध्यक्ष धर्मदास पाटील,आदिवासी आघाडीचे पिंटु पावरा,वसंत पावरा,इंजि.राम जाधव,सौ.भारती पोद्दार,डाॅ.विजय जाधव,निंबा पाटील,आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here