शिव अंगणवाडी संघटनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड यांचा अपघाती मृत्यू

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे तसेच शिव अंगणवाडी संघटनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप भोसले आणि महेंद्र गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री घडली. पालीजवळ हा अपघात घडला असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बीड तालुक्यातील पाली जवळ भीषण अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली , यामध्ये बीडमधील सामाजिक कार्यकर्ते व शिव अंगणवाडी संघटनेचे मराठवाडा प्रमुख दिलीप भोसले आणि गायकवाड हे दोघे जण जागीच ठार झाले असून अन्य एक जखमी झाल्याची माहिती आहे. एमएच २२ – ५२७७ या क्रमांकाची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर धडकल्याने हा अपघात झाला.

अंबाजोगाई येथून बीडकडे येत असताना हा अपघात झाला असून मागील काही महिन्यापूर्वी दिलीप भोसले यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आता दिलीप भोसले यांचाही अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here