खासदार धैर्यशील मानेंच्या पाठपुराव्याला यश; सांगली – कोल्हापूर रस्त्याबाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : शनिवारी (दि.२५) केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना.नितीनजी गडकरी यांचेकडे खासदार धैर्यशील माने यांनी रत्नागिरी – कोल्हापूर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते सांगलीपर्यंतचा रस्ता नॅशनल हायवे अॅथॉरिटीकडे हस्तांतरण करण्याची मागणी केली.

खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, त्यांच्या मागणी ना.नितीन गडकरी यांनी हा रस्ता तात्काळ नॅशनल हायवे अॅथॉरिटीकडे हस्तांतरीत करत असल्याचे जाहीर केले.

पुढील सहा महिन्यात या रस्त्याचा डीपीआर तयार करून नवीन रस्त्याच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here