भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : मोटार सायकल चोरी करुन लोकांकडे गहाण ठेवून त्याचे कडून पैसे घेणारे अट्टल मोटार सायकल चोरी करणारे आरोपी आरीफ तडवी व चेतन चव्हाण यांच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी मुसक्या आवळ्ल्या आहेत.
मागील वर्षा भरा पासून मोटार सायकल चोरीचे सत्र सुरुच असल्याने मोटार सायकल चोरी करणार आरोपीतांचा शोध घेणे बाबत अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर अधीक्षक रमेश चोपडे चाळीसगाव यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना आदेश दिले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील सफौ. अशोक महाजन, सफौ. रवि नरवाडे, पो.हे.कॉ महेश महाजन, पो.ना किशोर राठोड, पो.ना रणजित जाधव, पो.ना श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ विनोद पाटील, पो.कॉ उमेशगीरी गोसावी, पो.कॉ ईश्वर पाटील, पो.कॉ हेमंत पाटील, चा.पो.हे.कॉ दिपक चौधरी, चा.पो.ना मुरलीधर बारी, चा.पो.ना अशोक पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांना नेमण्यात आले.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरीफ शरिफ तडवी (वय २४) रा.गणेश नगर पहूर हा मोटार सायकल चोरी करीत असल्याची बातमी मिळाली असून त्याप्रमाणे आपण तेथे जावून त्याची खात्री करा व त्यास ताब्यात घेवुन पुढील योग्य ती कारवाई करा असे नेमलेला पथकास आदेश दिले.

त्यावरून या पथकाने त्याचा पहूर येथे शोध घेत असता तो जामनेर पहूर रोडवर मोटार सायकलसह मिळून आल्याने त्याची विचारपूस करता तो उडवा उडवीचे उत्तर देवू लागला व त्याचे कडेस मोटारसायकलचे कागदपत्र नसल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने सदरची मोटारसायकल त्याने व चेतन संजय चव्हाण (वय २३) रा.लोहारा ता.पाचोरा अश्यांनी मिळून चोरी केल्याचे कबुली दिली. त्यावरून आरिफ शरिफ तडवी व चेतन संजय चव्हाण यांच्या मुसक्या आवळून त्यांचे कडून ५,१५,००० /- रु. कि. च्या १९ मोटार सायकल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना यश आले आहे.
आरोपीतांन कडुन स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जळगाव एमआयडीसी, जामनेर, पिंपळगाव हरेश्वर, पहूर या पोलीस स्टेशनमधील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.






