वरगव्हाण येथील गोरख रामकृष्ण पाटील ९४.३ माय एफएमतर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित

जळगाव जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांचा आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरव

जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर निखिल ठाकूर) : येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे ९४ . ३ माय एफ. एम.तर्फे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम म्हणून शेतीत वेगवेगळ्या पद्धती वापरून, नव्या आधुनिक तंत्राचा वापर करून प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी “फँन्टास्टिक फार्मर अवॉर्ड” वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोग करून शेती व्यवसायात आपले नावलौकिक मिळवित चांगले उत्पन्न घेणारे शेतकरी व शेती व्यवसायात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ातील तब्बल ४० शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावाचे पोलीस पाटील तसेच प्रगतिशील शेतकरी नानासो गोरख रामकृष्ण पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

farmer-award-by-my-fm

 

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक – डी. डी. बच्छाव, जळगांव महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन माय एफ. एम.चे विवेक पॉन यांनी मानले.

यावेळी वरगव्हाण ग्रामपंचायत सरपंच, भुषण गोरख पाटील, उपसरपंच मिमा प्रताप बरेला, सदस्य रवी भाऊ पाटील, जहांगीर तडवी, जावेद तडवी, सदस्या, इंद्रायणी महेंद्र पाटील, यास्मिन युनूस तडवी, सायलिबाई देवाजी पावरा, सपना सुरशिंग पावरा, गावातील समाजसेवक हैदर तडवी, जहाभाज तडवी, महेंद्र पाटील यांनी नानांचे अभिनंदन केले आहे ग्रामस्थांनी आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित केल्या बद्दल अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here