अहमदनगर (प्रतिनिधी) : मूल होत नाही म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे. विकृतीचा कळस गाठणारा हा प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे.
मूल होत नाही म्हणून पतीनेच आपल्याला जबरदस्ती त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप पत्नीने केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पतीच्या मदतीने त्याच्या मित्रानेच विवाहितेवर अत्याचार केले. पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.






