शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ ईडीच्या ताब्यात

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने सिटी को ऑपरेटिव्ह बँकेतील ९०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करत आहे. ईडीचे अधिकारी आज सकाळी ६ वाजता अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळाली होती.आनंदराव अडसूळ यांच्याबरोबर त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स पाठवल्याची माहिती आहे.आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या २ वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ५ जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here