जळगाव (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : श्री कल्पवृक्ष कलशाकार तिर्थक्षेत्र (फर्दापूर तांडा, ता.सोयगाव) प्रणेते प.पू.आचार्य श्री १००८ कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता महानिर्वाण झाले.
महाराजश्रींनी त्यांचे आद्यगुरु प.पू.आचार्य १००८ श्री दर्शनसागरजी महाराज (सुसनेर, म.प्र.) यांचे आज सकाळी आशिर्वचन घेतले होते. सोबतच सर्व आचार्य व मुनिश्रींचे उपदेशही घेतले होते. त्यांची सल्लेखना सुरु असतांनाच त्याचे संध्याकाळी ७.३० वाजता महानिर्वाण झाले.
त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी अन्नत्याग (आहारत्याग) केला होता, असे तिर्थक्षेत्र निर्देशक सपना दिदि आणि दिगंबर जैन तरूण बहुउद्देशीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले






