साईलीला महिला बचत गटाकडून आसराबारी पाड्यावर कुपोषणा संदर्भात जनजागृती

भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : यावल तालुक्यातील आसराबारी या आदिवासी पाड्यावर साईलीला महिला बचत गटांकडून माता प्रबोधन करण्यात आले व लहान मुलांची तपासणी करुन औषधे देण्यात आली.

जिल्ह्यातील अनेक पाडे व वस्ती यामधील अनेक लहान मुले कुपोषणाची शिकार आहेत शासनाच्या योजना असूनही बरेच ठिकाणी त्या राबविल्या जात नाहीत त्यामुळे आपणच या द्रुष्टीने काही प्रयत्न करावे म्हणून बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेवून या वस्तीवर माता प्रबोधन व तपासणी ची मोहिम राबविली .

यावेळी डॉ स्वाती गाजरे यांनी महिलांनी गरोदर पणात कसा सकस आहार घ्यावा व बाळंतपणानंतर ही बाळाचा व स्वतः चा आहार ,तब्येत कशी सांभाळावी तसेच घरातील उपलब्ध वस्तुंमधून व परसबागेतील पालेभाज्या फळभाज्या याचा वापर करून कसे बाळाला व स्वतःला निरोगी ठेवू शकता याविषयी मार्गदर्शन केले.तिसरी लाटेचा मुलांवर परिणाम होवू नये म्हणून काय काळजी घ्यावी हे सोप्या पद्वतीने समजावले ज्या मुलांना तब्येतीचा काही त्रास होता त्यांना डॉक्टरांनी तपासून औषधी दिली. तसेच गटाच्या अध्यक्षा अँड जास्वंदी भंडारी यांनी कोविड पासुन बचाव करण्यासाठी लसीकरण किती महत्वाचे आहे हे सांगुन सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले.

यावेळी वस्ती वरील सर्व मुलांना व महिलांना राजगिरा लाडू व चिवडा पाकीटाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटाचे सभासद सुनिता राणे,नेहा यावलकर, मनिषा बर्हाटे, रेखा धुपे,मनिषा भंडारे, अनिता राणे, कार्यकर्ते विरसिंग वसावे, प्रतिक्षा राणे ,उत्कर्ष भंडारी व सभासद यांनी मेहनत घेतली .डॉ.श्री. किशोर मोरे व डॉ. लवलेश मिश्रा यांनी औषधी उपलब्ध करुन दिली.श्री.अनिल खरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here