मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी तृतीयपंथीयांना वंचित बहुजन आघाडी नालासोपारा पुर्व ऑफिस मधून राशन वाटप करण्यात आले.
यावेळी ४० जणांना आज राशन वाटप झालं आहे . यावेळी वसई विरार महानगरपालिका अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आणि रेणुका सचिन जाधव वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते , दुर्गा कांबळे, राजेश्वरी गुप्ता , निशा गुप्ता, गुडिया सोनी, माया प्रसाद , संध्या दुबे, संगीता प्रसाद,आकाश गायकवाड , गौतम कांबळे, प्रतीक इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

हा कार्यक्रम खाना चाहिए फाउंडेशनचे मंगेश सर आणि पारस सर यांच्या विद्यमाने तृतीयपंथीयांना रेणुका सचिन जाधव यांनी धान्य वाटप केले .






