क्षेत्र सभेसाठी,अनधिकृत बांधकाम-शहर विद्रुपीकरणाविरुद्ध आमरण उपोषणाच्या सातव्या दिवशीपण पालिका ढिम्म

असलम बागवान यांच्या समर्थनासाठी आयुक्तांवर फोन, मेलचा वर्षाव

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ​पुणे पालिकेच्या प्रभागामध्ये ​क्षेत्र सभेसाठी,अनधिकृत बांधकाम-शहर विद्रुपीकरणाविरुद्ध इनक्रेडिबल समाजसेवक ​ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांच्या आमरण उपोषणा सातव्या दिवशीपण पालिका ढिम्म असल्याने उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते असलम बागवान यांच्या समर्थनासाठी पालिका आयुक्तांवर स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी फोन, मेलचा वर्षाव केला.

पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांना मनपा दारात उपोषण सूरू आहे याची माहिती देखील नाहि असे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोहिमेत दिसून आले. 21​ ​सप्टेंबर पासून पुणे मनपा येथे उपोषण सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विविध नागरी सुविधासाठी,नागरिकांचा प्रशासकिय कारभारात समावेश करण्यात यावा,क्षेत्रसभा न घेतलेल्या दोषी नगरसेवक (प्रभाग क्रमांक 27) अनुक्रमे अ ब क ड यांना बडतर्फ करण्यात यावे,संकल्पना फलकावर व शहरविद्रपीकरण ​करणाऱ्यांवर कारवाई करावी,पुणे महानगरपालीकेचा महसूल बुडविणाऱ्या नगरसेवकावर गुन्हे दाखल करणे,अनधिकृत बांधकाम यावर कारवाई,निवेदेचे स्पष्टीकरण इत्यादी विषयावर ठोस कारवाई करावी या मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आहे.

कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करणाऱ्या पुणे मनपा अधिकार्यावर कारवाई करण्यासंदर्भात इनक्रेडिबल समाजसेवक ​ग्रुप,क्षेत्रसभा समर्थन मंच,एनएपीएम(जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय).रा​ष्ट् सेवा​ ​दल,संविधान बचाव समिती व इतर सामाजिक संस्था यांच्या पाठिंब्याने सुरु असल्याचे असलम इसाक बागवान यांनी सांगितले.याच विषयावर आंदोलन,स्मरण आंदोलन,ठिय्या आंदोलन करून​ही पुणे मनपा आयुक्त व संबंधित यावर कुठलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने हे आमरण उपोषण करण्यात येत आहे.

राष्टसेवादल आणी जनतादल सेक्युलर पुणे याचे सरचिटणीस दत्ता पाकिरे, सेवादल कार्यकरते प्रकाश कदम, साधनाताई शिंदे, इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे राजू सय्यद, समिर मुल्ला, कबिरशेख, विना कदम, नितिन बसरूर कम्युनिस्ट पक्षाचे अरविंद जक्आ यांची उपस्थिती होती.

सुभाष वारे, सुनीती सु.र. लोकशाही उत्सव समिती चे मिलिंद चव्हाण,अलका पावनगडकर, एम आय एम पार्टि, जनतादल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया तसेच एस एम जोशी फौंडेशन, सेस्यालिस्ट पार्टा आँफ इंडीया, पुणे जिल्हा कामगार अन्याय प्रतिकार समती. लेबर लाँ पँर्टिक्सनेक्स असो, सर्वोदय मंडळ पुणे. अँड संतोष म्हस्के, अँड व्हि एस वर्मा, संदेश दिवेकर, इबराहिम खान, शोहेब शेख, अँड शमिन शेख राज फैय्याज, रियाज बंगाली, साहिद शेख सचिन अल्हाट, विजय थापा, धनराज सोनकांबळे,राजू सय्यद, नासीर शेख कबिर शेख यांनी आणि संस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here