आत्महत्येस प्रवृत करणारे महिंद्रा फायनान्सच जबाबदार; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची वंचिततर्फे निवेदनाद्वारे मागणी

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी येथील रहिवासी दादासाहेब लक्ष्‍मण ठेंगडे पाटील वय (३८) यांना आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या महेंद्र फायनान्स खाजगी बँक व्यवस्थापक व सुशील पवार व एक सोबत कर्मचाऱ्यावर भारतीय दंड संहित कलम 306 अनुषंगाने गुन्हा नोंद करण्यासंदर्भात आज पोलीस ठाणे खुलताबाद येथे वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दादासाहेब लक्ष्मण ठेंगडे पाटील (वय ३८) राहणार पळसवाडी तालुका खुलताबाद येथील रहिवासी असून त्यांनी महिंद्रा फायनान्स खाजगी बँक तर्फे दीड लाखाचे कर्ज घरकाम करण्यासाठी घेतले होते त्यांनी काही हप्ते परतफेड सुद्धा केले आहे. परंतु मागील दोन ते अडीच वर्षा पासून भारत देशात कोरोना संसर्ग महामारी मुळे सर्व लोकांची आर्थिक घडी बिघडली तरी सदरील व्यक्ती हप्ते भरण्यास हतबल झाल्याने हप्ते भरू शकला नाही त्यावर महिंद्रा फायनान्स बँक प्रशासनाने परिस्थिती समजून न घेता ठेंगळे पाटील यांना बँक व्यवस्थापक व त्यांचे दोन अधिकारी सुशील पवार व धांगडे पाटील, यांच्याकडे वारंवार येऊन मानसिक त्रास व तगादा लावून अपमान अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आहे म्हणून ठेंगडे पाटील यांनी आपल्या शेतात जाऊन दि२६ सप्टेंबर रविवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चिंचेच्या झाडाला गळफास घेतली व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बँक अधिकाऱ्यांच्या तगाद्यामुळे व त्रासामुळे ठेंगडे पाटील यांचा मृत्यू झालेला आहे. तरी वंचित बहुजन आघाडी खुलताबाद तर्फे प्रशासनाला विनंती करण्यात येते की, ठेंगडे पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यवस्थापक व सुशील पवार आणि एक सोबती ज्यांचे नाव मृत्यूपूर्वी ठेंगडे पाटील यांनी चिट्ठी मध्ये लिहून ठेवली आहे म्हणून व्यवस्थापक सुशील पवार व आणखी एका व्यक्तीवर भारतीय दंड संहिता कलम ३०६ अनुसार गुन्हा नोंदवावा कारण ठेंगडे पाटील यांची आत्महत्या नसून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा.nivedan-against-mahindra-finance

याबरोबरच मयत ठेंगडे पाटील यांच्या कुटुंबाला ३० लाख रुपये मदत द्यावी. एका व्यक्तीला बँकेत अस्थायी स्वरूपात नोकरी द्यावी. व उर्वरित कर्ज माफ करावे.संबंधित विषयाची गंभीरपणे दखल घेऊन प्रशासनाने आठ दिवसात वरील प्रमाणे मागण्या पूर्ण कराव्या प्रशासनाने गंभीरता न दाखवल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे पोलीस स्टेशन खुलताबाद येथे तीव्र आंदोलन/निदर्शने करण्यात येईल याची दक्षताने नोंद घ्यावी. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेजवळ, जिल्हा संघटक बाबा पटेल, नितीन जाधव, राजाराम घुसळे ,असलम मोमीन, मनोज कुचे ,किरण भालेराव, दिनेश साळवे ,किरण विघे, सागर तुपे, मुनीर शहा, अजय साठे, कृष्णा कदम व तालुका अध्यक्ष मुक्तार भाई सय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खुलताबाद पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here