जालिंदर बोरुडे यांचे कार्य अभिमानास्पद – अ‍ॅड.आगरकर

श्री विशाल गणेश देवस्थानच्यावतीने जालिंदर बोरुडे यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी) : आपले काम करत असतांना आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने काम केले पाहिजे. समाजातील गरजूंना मदत करुन त्यांचे दु:ख हलके करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे करत आहेत. त्याचबरोबर नोकरी सांभाळून अधिकारी- कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या कार्यात श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद कायम राहतील. त्यांचे हे जनसेवेचे कार्य अखंडपणे सुरु रहो, अशा सदिच्छा श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, तुषार पोटे आदि उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स सोशल फौंडेशनच्या माध्यमातून गरजूंपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर बहुजन अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून कर्मचार्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम करत आहे. आता जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने आपण पार पाडू. आपल्या कार्यात अनेकांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याने हे कार्य असेच अखंडपणे सुरु राहील, असे सांगितले.

यावेळी श्री.बोरुडे यांना राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती, नवीदिल्ली यांचा ‘नेत्रदूत’ पुरस्कार मिळाल्याबद्दलही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशोक कानडे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here