शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शहरात असलेल्या पिंपळवाडी रोडला शिवाजी महाराजां चे नाव द्यावे. अशी मागणी शिर्डी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत गायके यांनी केली आहे. शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नवीन पिंपळवाडी रोड व जुना पिंपळवाडी रोड हा साईश कॉर्नर पर्यंत संपतो. त्यानंतर यापुढे फक्त पिंपळवाडी रोड या नावाने ओळखला जातो. नवीन व्यक्ती चुकून पिंपळवाडी पर्यंत जातो, त्यामुळे अशा लोकांना योग्य पत्ता सापडत नाही. या कारणामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून त्या रस्त्याचे नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असे करावे. जनतेला व साई भक्तांना होणारा त्रास तात्काळ दूर करावा अशी मागणी केली. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सकारात्मक निर्णय घेऊन येणाऱ्या बैठकीत तात्काळ निर्णय घेऊन अडचण दूर करू असे आश्वासन दिले.
यावेळी शिर्डी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमृत गायके कार्याध्यक्ष अमोल कोते, सौरभ हाडवळे, बाबा घोगरे ,उपाध्यक्ष चंद्रभान पवार, संतोष वाघमारे, दिपक पवळे, सरचिटणीस कमलेश जाधव, सचिव कृष्णा गायकवाड, गणेश गायके, प्रसाद गायके आदी उपस्थित होते.





