पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जागतिक हृदय दिनानिमित्त महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरच्या एम ए रंगूनवाला कॉलेज फिजिओथरपीतर्फे ‘असेसमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ कार्डियाक रिस्क फॅक्टर्स’ या विषयावर विनामूल्य वैद्यकीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर आझम कॅम्पस येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी साडेतीन दरम्यान होणार आहे.प्राचार्य डॉ रोनिका अगरवाल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.






