जनसमुदायाला अभिवादन करताना भाजपा नेते स्टेजवरुन खाली कोसळले; पहा व्हिडीओ

भोपाळ (मध्यप्रदेश) : येथे सुरु असलेल्या जनदर्शन यात्रेमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सहभागी झाले असून अनेक गावांचा दौरा करत आहेत. लोकांपर्यंत मोदी सरकारने केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी ही जनदर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी चौहान आज खारगोन जिल्ह्यात पोहोचले होते. त्यावेळी, व्यासपीठावरुन हात उंचावून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करताना, त्यांच्या शेजारी असलेले भाजपा नेते स्टेजखाली कोसळले.

शिवराजसिंह चौहान यांनी जनदर्शन यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच, पंजाबमधील परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेसल लक्ष्य केलं. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूमुळे कॅप्टन यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात आले. पण, आता सिद्धूनेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वात ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तत्पूर्वी ते उपस्थित असलेल्या खारगोने येथील जनदर्शन यात्रेसाठी व्यासपीठावर जात असताना, स्थानिक नेते खाली पडले.

शिवराजसिंह समोरील जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन करत होते. त्यावेळी, हे स्थानिक नेतेही हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांना स्टेजचा अंदाजच आला नाही. त्यावेळी, ते पुढे चालत असताना खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, तात्काळ त्यांना सहकाऱ्यांनी उचलून घेतल्याचे दिसून येते. ते किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here