ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : चुलत भावाकडून अत्याचार बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. भिवंडी येथे २४ वर्षीय चुलत भावाने १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या चुलत भावाला आज सकाळच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील एका गावातून पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी तालुका ग्रामीण भागातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तिच्या घरातच आरोपी चुलत भाऊ राहतो. काही महिन्यापासून तो पीडितेवर वारंवार अत्याचार करीत होता.
त्यातच आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नव्हती. परंतु पीडित अल्पवयीन मुलीने २६ सप्टेंबर रोजी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला. त्यानंतर तक्रार दाखल केली.






