जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

अहमदनगर (प्रतिनिधी) : येथे जन्मदात्या वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई बाहेरगावी गेली असताना २८ जुलैच्या रात्री बापाने ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दोनवेळा लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आईला दिली आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मुलगी रात्री झोपलेली असताना वडिलांनी तिचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापाला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here