आज ३२१ रुग्णसंख्या वाढली तर ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आज (दि.६) नव्याने 321 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 हजार 087 झाली आहे. सर्वाधिक 79 कोरोनाबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज दिवसभरात 200 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.
सलग तिसर्या दिवशी कोरोनाने तीनशेचा आकडा पार केला आहे. नव्याने आढळलेल्या ३२१ रूग्णांमध्ये जळगाव शहर 79, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 19, अमळनेर 15, चोपडा 20, पाचोरा 18, धरणगाव 18, यावल 9, एरंडोल 51, जामनेर 15, रावेर 6, पारोळा 3, चाळीसगाव 18, मुक्ताईनगर 36, बोदवड 1 इतर जिल्ह्यातील 1 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव, धरणगाव तालुक्यात प्रत्येकी 2 तर जळगाव तालुका, रावेर, पाचोरा व एरंडोल या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







