आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

मुंबई (हितेश मिस्त्री) – टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मालाड इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरण ताजे असताना आज ४४ वर्षीय समीरने आत्महत्या केल्याने चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. समीरने ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांखेरीज समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र समीरच्या घरातून कोणतीच सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास मालाड पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here