भुसावळ (गिरीश पवार) – तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे ) येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे . रुग्णांची संख्या सात झाली आहे . यातील तीन रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहे . मात्र गावात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पाटील व लोकमत पत्रकार उत्तम काळे यांच्या नेतृत्वाखाली गावात टँकरने सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
शहर व तालुक्यात कोरोनाने कहर केला होता . कुऱ्हे ( पानाचे ) येथे मात्र जुलै महिन्यापर्यंत एकही रुग्ण न होता . जुलै महिन्यातील मध्यंतरीच्या काळात व तीन ऑगस्ट पर्यंत सात रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे . यातील तीन रुग्ण सुधारले असून ते घरी आले आहेत . चार रुग्णांवर उपचार सुरू आहे. कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील व मित्र मंडळ यांनी यापूर्वी तीन दिवस गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते . व गावात गोळ्यांचे वाटप केले होते . तर पुन्हा रुग्ण सापडल्यामुळे ग्रामपंचायत माजी सदस्य सुभाष पाटील , पत्रकार उत्तम काळे , ग्रामपंचायत माजी सदस्य जितेंद्र नागपुरे , राजू भगत , एकनाथ धांडे , किशोर पाटील,संजय कोळी ,राहुल पाटील , प्रदीप शिंदे ,. अमोल पाटील , बापू भागवत शिंदे ,अजय कोळी,व मित्रमंडळातर्फे फवारणी प्रारंभ करण्यात आला आहे.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून कुऱ्हे (पानाचे) येथे टँकरने सॅनिटायझर फवारणी







