माजी राज्यपालाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल

porn-video-on-mobile

नवी दिल्ली : माजी राज्यपालांचे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील ही घटना असून सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद जुबेर उमर यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. जुबेर यांचे पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय चे जवळकीचे संबंध आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये जुबेर अनेक तरुणींसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.

पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे माजी राज्यपाल मोहम्मद जुबेर उमर यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कराचीतील एका हॉटेलमध्ये हे व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या व्हिडीओंपैकी 1 मिनिट 7 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जुबेर यांचे आणखी व्हिडीओ समोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुबेर या व्हिडीओमध्ये अनेक तरुणींसोबत दिसत आहेत.

असे असले तरी हे व्हिडीओ खोटे असल्याचे जुबेर यांनी म्हटले आहे. आपल्या विरोधात कट रचण्यात आला आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here