अंडरवेअरच्या जाहिरातीमुळे अभिनेत्री रश्मिका सोशल मिडीयावर होतेय ट्रोल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : राष्ट्रीय क्रश आणि साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका सध्या ट्रोल होत आहे. या ट्रोलिंग मागे पुरुषांच्या अंडरवेअरची जाहिरात कारणीभूत आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या दिलखेच अदा आणि सुंदर डोळ्यांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत आली आहे. त्यामुळे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय क्रश’पर्यंत मजल मारली. पण सध्या ती एका जाहिरातीमुळे ट्रोल होत आहे. सध्या टीव्हीवर विकी कौशलसोबत पुरुषांची अंडरवेअर जाहिरात दाखवली जात आहे, ज्यात रश्मिकाच्या काही अदांवर चाहत्यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. काही चाहते भडकलेही आहेत. परिणामी सोशल मीडियावर रश्मिकाला जोरदार ट्रोलचा सामना करावा लागत आहे.

काही युजर्सनी विकी आणि रश्मिका या दोघांनाही टार्गेट करत ट्रोल केले आहे. चाहत्यांकडून या दोघा कलाकारांचा ट्विटरवर वर्ग घेतला आहे. युजर्सच्या कमेंटवरून असं दिसत आहे की, त्यांना ही जाहिरात आवडलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here