मोबाईलवर गेम खेळतो म्हणून बोलल्याचा राग आल्याने, १६ वर्षीय तरुणाची विहिरीत उडी

बुलडाणा (प्रतिनिधी) : सतत मोबाईलवर गेम खेळतो म्हणून घरातील लोकांनी बोलल्याचा राग आल्याने, १६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. त्याच्या या निर्णयाने मात्र कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिले. मात्र या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाईन गेमच्या सुद्धा आहारी जात

याबाबत समजलेली माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील १६ वर्षीय मुलाचं राहुल राऊत हा सातत्याने मोबाईल गेम खेळत असे. त्यामुळे त्याच्या पालकांनी मोबाईलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. आपल्या पालकांचा बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे आपण घरी येणारच नाही, असं रागात तो म्हणाला होता. त्यानंतर त्याने रागात स्वत:चा जीव देवून आई-वडिलांना आयुष्यभराची शिक्षा देण्याचा विचार केला. राहुलच्या घराशेजारीच एक विहीर आहे. राहुलने मागचापुढचा कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा दुर्देवाने विहीरीत बुडून मृत्यू झाला.

संबंधित घटनेची माहिती राहुलच्या कुटुंबियांना देण्यात आली. यावेळी राहुलच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. आपण उगाच त्याच्यावर ओरडलो, अशी भावना त्यांच्या मनात आली. राहुलच्या कुटुंबियांना आक्रोश करताना बघून गावातील इतर नागरिकांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलं. या दरम्यान राहुलचा मृतदेह विहिरीत बाहेर काढण्यात आला. पोलिसांनादेखील या घटनेची माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here