मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : गेल्या आठवड्यात बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट मान्यवर ब्रॅण्डच्या जाहिरातीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या जाहिरातीवर नाराज झालेल्या एका व्यक्तीने संबंधित कंपनी आणि आलिया भट यांच्यायाविरोधात मुंबईतील सांताक्रुज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, या जाहिरातीमध्ये कन्यादान चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आलं आहे. तक्रारदाराने या प्रकरणी कंपनी आणि आलिया विरोधात मुंबईतील सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय.
या जाहिरातीवर सोशल मीडियामध्येही अनेक लोकांनी नाराजी व्यक्ती केली होती. अनेक धर्मांमध्ये अनेक अशा प्रथा आहेत, ज्याविरोधात जागृती केली जात नाही. परंतु, काही ब्रँड्स फक्त हिंदू धर्माविरोधातील प्रथावर जाहिरात करत आहेत, असे काहींनी म्हटले होते. तसेच काही जण विवाह संस्काराला चुकीची पद्धतीन सादर करत आहेत. अशा जाहिरातीमुळे भावना दुखावल्या जातात, असेही काहींनी म्हटले होते.






