‘ओझोन टू क्लायमेट’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : तेर पॉलिसी सेंटर आयोजित ‘ओझोन टू क्लायमेट’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण गुरुवारी सायंकाळी ऑनलाईन पार पडले.लेफ्टनंट कर्नल अद्वैत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

घोषवाक्य स्पर्धेतील विजेते भूमिका जे.एस.,मानसी दास,डॉन जोसेफ सुनू,नक्षत्रा,इम्यान्युएल अलेक्स तसेच भित्तीपत्रक स्पर्धेतील विजेते आलिशा पांडा,कल्याणी बेहेरा,वेदश्री वाळिंबे,आस्था पटनायक,अलझिमा झैनब यांना या समारंभात गौरविण्यात आले.या राष्ट्रीय स्पर्धेत बाराशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते.

लेफ्टनंट कर्नल अद्वैत पाटील म्हणाले,’लहान वयामध्ये निसर्ग,पृथ्वी आणि पर्यावरणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश पुढील पिढ्यांकडे जात राहणे महत्त्वाचे आहे.’

तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे म्हणाल्या,’विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम निर्माण करण्यासाठी घोषवाक्य आणि भित्तीपत्रक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या उपक्रमांमधून प्रत्येकाला प्रेरणा मिळते आणि निसर्गाची काळजी घेण्याचा संदेश मिळतो’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here