केवायसी अपडेटच्या नावाखाली निवृत्त अभियंत्याला घातला चुना

fruad

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : केवायसी अपडेटच्या नावाखाली निवृत्त अभियंत्याला चुना लावल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे निवृत्त अभियंते असून ते मालाड परिसरात राहतात. त्यांच्या मोबाईलमध्ये पूर्वी एमटीएनएलचे सिमकार्ड होते. त्यांनी तो नंबर पोर्ट केला होता. तीन दिवसांपूर्वी तक्रारदार हे घरी असताना त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. एमटीएनएलचे सिम डॉक्युमेंट अद्याप बाकी असून कार्ड अपडेट न केल्यास ते बंद होईल असे त्या मेसेजमध्ये नमूद होते.

भीतीपोटी तक्रारदार यांनी त्या मेसेजमधील नंबरवर पह्न केला. पह्न उचलणाऱया व्यक्तीने तो एमटीएनएलच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या कार्डची केवायसी अद्याप केलेली नाही. केवायसी न केल्यास तुमचे कार्ड बंद होईल अशा भूलथापा मारल्या गेल्या.

केवायसी अपडेटसाठी क्विक सपोर्ट अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी ते अॅप्स डाऊनलोड केले. अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर केवायसी अपडेटसाठी १० रुपये शुल्क लागेल असे सांगण्यात आले. केवायसी अपडेट आवश्यक असल्याने तक्रारदारांनी नेट बँकिंगवरून १० रुपये पाठवले. त्यानंतर तक्रारदारांच्या खात्यातून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये काढले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here