घरफोडी करणाऱ्यांच्या आरोपींच्या भोकरदन पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जालना (प्रतिनिधी) : भोकरदन शहरात दोन संशयित फिरत असल्याची माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून जवळपास सहा लाख रुपये रोख व पावणे चार लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. चलाखीने घरफोडी करणारे हे अट्टल गुन्हेगार असून यांना पकडल्यानंतर भोकरदन पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

३० सप्टेंबर गुरुवार रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. जोगदंड यांना समता नगर भोकरदन परिसरात दोन संशयित इसम फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानंतर त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सह पोलीस निरीक्षक आर. के. तडवी, पोलीस नाईक वायकोस, पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांना सदर ठिकाणी पाठवून संशयितरित्या फिरत असलेल्या शेख अमीर शेख रमजानी (रा. मिल्लतनगर, जालना) आणि समीर सय्यद जावेद (रा. माळीपुरा, जालना) या दोन इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये रोख रक्कम व सोने-चांदी आढळून आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी २९ सप्टेंबर रोजी जालना येथून एका घरातून घरफोडी केल्याचे कबूल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here