सनशाईन इमारतीच्या ४० व्या मजल्यावरून उडी मारून इंजिनिअरने संपवले आयुष्य

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : दादर फुल मार्केटशेजारी असलेल्या सनशाईन या इमारतीच्या ४० व्या मजल्यावरून उडी मारून एका ५१ वर्षीय कर्मचाऱ्याने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेने दादर परिसरात एकच खळबळ माजली होती.

मृत इसमाचे नाव निखिल माधव जोशी असं असून ते दादरमध्ये कबुतरखाण्याच्या परिसरात राहण्यास होते. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दादर रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पश्चिमेकडील सनशाईन टॉवरमध्ये ३६ व्या मजल्यावर सुनंदा स्पेशालिटी कोटिंग प्रा. लि. या कंपनीत निखिल जोशी हे इंजिनिअर म्हणून नोकरी करत होते. गेली २० पेक्षा अधिक वर्ष निखिल या कंपनीत काम करत होते. मात्र, काल गुरुवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास निखिल यांनी सनशाईन टॉवरच्या ४० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण पोलीस शोधत असून पोलिसांचा तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here