रामोजी फिल्म सिटी ८ ऑक्टोबरपासून पुन्हा होणार खुली

हैद्राबाद (तेलंगाणा) : येथील जगप्रसिध्द रामोजी फिल्म सिटी ८ ऑक्टोबरपासून पर्यटनाचा आनंद घेण्याकरिता खुली होणार आहे. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी अशी ओळख असलेली रामोजी फिल्म सिटी २ हजार एकरांमध्ये आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना, परिपूर्ण हॉलिडे पॅकेज आणि विश्रांतीची ठिकाणे असल्याने येथील सहल ही आनंदी आणि सुरक्षित असण्याची खात्री देते.

रामोजी फिल्म सिटी ही तब्बल २ हजार एकरांवर पसरलेली आहे. ही सिने-जादूची अद्भूत व मनाला मोहित करणारी नगरी आहे. आकर्षक गार्डन, रंगीबेरंगी कारंजे यासह कल्पक असे विविधांगी मनोरंजन याठिकाणी अनुभवता येणार आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली रामोजी फिल्म सिटी देशातील एक अनोखे मनोरंजनाचे आणि पर्यटनाचे ठिकाण आहे. येथील परिपूर्ण सुविधांना तांत्रिक, वास्तूकला आणि आखीव-रेखीव रचनेची जोड मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांद्वारे ही रचना करण्यात आलेली आहे.

रामोजी फिल्म सिटी हे अनेक चित्रपटांच्या शूटिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सर्वसमावेशक चित्रपट निर्मितीच्या पायाभूत आणि व्यावसायिक सेवा येथे एकत्रितपणे देण्यात येतात. पूर्ण आणि तणावमुक्तीने चित्रपटनिर्मितीचा अनुभव येथे घेता येतो. शूटिंगदरम्यान हव्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. एकाचवेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. रामोजी फिल्म सिटी हे पर्यटकांना एक चुंबकीय आकर्षणासारखे आहे. प्रतिवर्षी सुमारे 1.5 दशलक्ष पर्यटक येथे भेट देतात. अविस्मरणीय अनुभव आणि वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित मनोरंजनासाठी रामोजी फिल्म सिटी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here