सोसायटी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेडरुममधील चित्रिकरण करत असल्याचा महिलेचा आरोप

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील एका हौसिंग सोसायटीतील तळमजल्यावर राहणाऱ्या महिलेने तिच्या बेडरुमच्या खिडकीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला असून, गेला महिनाभर तिच्या बेडरुममध्ये काय चालले आहे हे ३ जण पाहत होते, असा आरोप केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून महिनाभर घरातील बेडरुममध्ये डोकावण्याचा आरोप सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि खजिनदारावर लावण्यात आला आहे.

ही घटना पुण्यातील हिंजवडी – वाकड रोडला असलेल्या सोसायटीतील आहे. ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेच्या म्हणण्यानुसार या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी बेडरुममधील चित्रिकरण पाहत होते असा आरोप आहे. बेडरुम ही प्रत्येकाची खासगी बाब असते, त्यात डोकावण्याचा हा प्रकार असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

आपल्याला जेव्हा लक्षात आलं की, असा प्रकार होतोय, तेव्हा आपण हा सीसीटीव्ही काढून टाका असं सांगितलं, तेव्हा संबंधित आरोपींनी नकार दिला. तक्रारदार महिलेवर कॅमेरा लावून ५ ते २८ सप्टेंबर दरम्यान खासगी कपड्यात असताना चित्रिकरण करुन ते या आरोपींनी पाहिलं असा आरोप आहे. पुढील तपास संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here