हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : शुक्रवारी (दि.१) ला प्रेरणा वस्ती स्तर संस्था व शहर स्तरीय संघ च्या वतीने उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, ठाणेदार यांना दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीने संस्थेत व सदस्यांच्या घरी जाऊन धमकवण्याच्या प्रकरणी निवेदन देण्यात आले.
प्रेरणा वस्ती स्तर संस्था रामनगर वॉर्ड हिंगणघाट येथे गटाच्या माध्यमातून बेघर व वृद्ध लोकांना सेवा दिली जाते परंतु काही दिवसांपासून दिनेश वर्मा नावाच्या व्यक्तीकडून वृत्तपत्रांमध्ये खोट्या बातम्या देऊन प्रत्यक्ष चालकांना धमकावून मानसिक त्रास देण्यात येत आहे मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या नियमानुसार निवाऱ्याचा सर्व आर्थिक व्यवहार हा नगर परिषदेला दिलेली आहे , तरी निवाऱ्यातील वयोवृद्ध लोकांना नाहक त्रास देत निवाऱ्यामध्ये रात्री बेरात्री पुरुषांना आणणे व महिला चालकांना फोन करून उद्धट भाषेत बोलुन मानसिक त्रास देण्याचा पराक्रम दिनेश वर्मा या समाजकंटकाने केला आहे .
स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजणारा दिनेश वर्मा, प्रेरणा वस्ती स्तर संस्थांचे अध्यक्ष व सभासद यांच्या निवास स्थानी जाऊन अभद्र व गलिच्छ वागणूक दिल्या प्रकरणी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली तसेच मुख्याधिकारी नगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय हिंगणघाट येथे निवेदन सादर करण्यात आले व कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी निर्मला भोंगाडे सचिव, शारदा भाले अध्यक्ष, प्रज्ञा नगराळे उपाध्यक्ष, विना बडे, अर्चना दुरबुडे ,चंद्रकला राऊत ,मंजू खानखुरे ,अनु मानकर, वर्षा लांजेवार शक्ती शहर स्तर संघ अध्यक्षा, सविता गायमुखे, मंगला कावळे, वैशाली कावळे,उषा कडू, सुकेशनी मुन, रेखा मुंजमवार, पुष्पा ठाकरे,जयश्री मेंडूले, शांता दुर्गे, शिला बोरकर, सिमा मेश्राम, सिंधू दखणे,राजश्री बाम्बोडे,शिला राजूरकर, संगीता भाजीखाये,दीपाली सुरकार कल्याणी इटनकर, माया फुलकर, भगत, रेडलावार इत्यादि सदस्य गण व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.






