रायगड (प्रतिनिधी जयेश जाधव) : रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळफाटा येथे रात्रीच्या गस्तीच्यावेळी पोलिसांना संशयास्पद एक कार आढळली. कार थांबवून सखोल चौकशी केली असता, त्या कार मध्ये असलेल्या 5 जणांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथून दिगंबर इंदलसिंग चितोडिया या तरूणाचे अपहरण केले असल्याचे उघडकीस आल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी अपहरणकर्त्यां टोळीच्या मुसक्या आवळून अपहरण झालेल्या तरूणाची सुटका केली.
अपहरण झालेल्या तरुणाचा जीव वाचवणाऱ्या खोपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस हवालदार नितीन कोळी ,पोलीस अंमलदार राम मासाळ, पोलीस अंमलदार स्वागत तांबे यांचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी खास अभिनंदन केले असून त्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय अलिबाग येथे विशेष प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करून त्यांना यापुढेही अशीच उत्कृष्ट कामगिरी बजावत रहाल अशी शुभेच्छा दिल्या.






