ज्यांना चोर म्हणून मारले, त्या माईचे पोर शाळा सांभाळते…..

महाराष्ट्र राज्यातील तीस आश्रम शाळेत भेट व्याख्यान देण्याचा योग आला,परंतू येथे वेगळ काही..

उस्मानाबाद (जिल्हा प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज उस्मानाबाद जिल्ह्य़ात यमंगरवाडी येथे आश्रम शाळेत भेट दिली,या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पुजा करण्यात आली,

या शाळेची सविस्तर माहिती रमाकांत पवार यांनी दिली तसे म्हणले तर यमगरवाडी आश्रम शाळेला अनेक महान नेत्यांनी विचारवंतानी भेट दिली असून अनेक विद्वानांचे व दानशुराचे सहकार्य लाभले आहे,अशा आश्रम शाळेत कामाठी म्हणून कार्यरत असलेले रमाकांत पवार यांची कहाणी एकुण अंगावर शहारे उभारले सन 19 93 ला धानोरा या गावामध्ये आमंचे कुटुंब फार सुखी होते, परंतु अचानक कोणीतरी गावात दरोडा पडला आणि रमाकांत पवार सुनिल पवार यांच्या वडिलांना पोलिसांनी पकडून नेले त्या आरोपात गोपीनाथ यांचा शेवट झाला, याच काळात रमाकांत यांची आई भिगाबाई गोपीनाथ पवार यांना पोलिसांनी पकडले,पोलीसानी नाही त्या कलमांचा वापर करून भिगाबाई यांना पोलिस कस्टडी मध्ये खूप मारहाण केली या मारहाणीत भिगिबाई यांचा मृत्यू झाला परंतु पोलिसांनी घरच्यांना कोणाला न विचारता भिगाबाईच्या प्रेताचे दफन केले, त्यावेळी हे लहान दोन भाऊ फार लहान होते

आपल्या गरिबीच्या झोपडीत सूर्य आणि चंद्रच्या किरणांन शिवाय काहीच उरले नव्हते, म्हणून रमाकांत व सुनील यांना प्रभूने काकांनी यंमगरवाडीच्या शाळेत आणले. तोच विद्यार्थी आज यमगरवाडी शाळेचा कामासाठी म्हणून कार्यरत आहे रमाकांत पवार यांना भेटताना अतिशय आनंद झाला कारण एखाद्या शाळेत गेल्यानंतर शाळेची सविस्तर माहिती हे एक आदिवासी देत आहे. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, यमगारवाडीत आश्रम शाळेत 400 विद्यार्थी शिकतात परंतु ही शाळा खरे पारधी समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी उभारलीगेली होती, काही कारणास्तव या शाळेत मुलांचा पट हा कमी दिसून आला, तसे यंमगरवाडी ही शाळा आहे ती मंगरूळ गावांमध्ये, यंमगरवाडी गाव हे चार की मी दूर आहे, या ठिकाणी गेल्यानंतर असे दिसून येते पारधी कुटुंबातील लोक हे आज देखिल अनिष्ट रूढी परंपरामध्ये अडखळलेत यामुळे आश्रम शाळेत मुलांना टाकण्यास टाळाटाळ करत असतात

आज्ञानाचा अंधार गड्यांनो जोवर संपणार नाही !!
ज्ञान विना समाज क्राती कधीच संपणार नाही,!! नेहमीप्रमाणे आदिवासी पारधी कुटुंब गावकुसाबाहेर कुठेतरी डोंगर द-यात रहातात त्यामुळे ते सर्व शासकीय सवलती पासुन दुरावतात, आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिक्षणाच्या दारापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे असे मला वाटते, तसे म्हणले तर यंमगरवाडी शाळा निसर्गाच्या सानिध्यात डोंगरामध्ये एकांत माळावर आहे, तिथे शाळेची इमारती फार सुंदर आहे प्रत्येक भिंतीवर महान विचारवंतांचे लेख आहेत, क्रांतिकारकांचे फोटो आहेत, शिक्षणाचे पाढे शिकवताना वृक्षारोपण केलेले आहेत अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते, आणि म्हणून याच शाळेतील विद्यार्थी रमाकांत पवार हा तिथे शिकला आणी तिथेच कामाला लागला, आज या शाळेचे विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या पदावर आहेत परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक दुःख भरी कहानी आहे,या आश्रम शाळेचे विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहे, आज रमाकांत पवार, सचिन कंत्राज भोसले, राजेंद्र सखाराम भोसले, मा. कोळपे, काळे सर, हे सर्व उपस्थित होते

नामदेव ज्ञानदेव भोसले. (साहित्यिक, महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार पुरस्कृत ) फोन 8888698870

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here