गोवा क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीत बॉलिवुडची मोठी कनेक्शन्स; एनसीबीचे प्रमुख प्रधान यांची धक्कादायक माहिती

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूजवर झालेल्या ड्रग्स रेव्ह पार्टीत बॉलीवुडची मोठी कनेक्शन्स उघडकीस आली आहेत, असा खुलासा नारकोटिक्स ब्यूरोचे प्रमुख आर. एन. प्रधान यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे.

मुंबईच्या समुद्रात कॉर्डेलिया क्रुजमध्ये ड्रग्स पार्टी , जहाजावर एनसीबीचा छापा , अटक केलेल्या दहा जणांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना नार्कोटिक्स ब्युरोने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानांनी बॉलीवुडच्या कनेक्शनचा खुलासा केला आहे. बॉलीवूड मधला सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा ड्रग्सच्या रेव्ह पार्टीत सापडतो. त्याच्याबरोबर बॉलिवुडमधल्या अनेकांची मुले सापडतात. यातून आणखी मोठी कनेक्शन पुढे येतील, असे ते म्हणाले.

गेल्या दोन आठवड्यांपासून नेमक्या गुप्तचर खात्याच्या अहवालावर आम्ही काम करत होतो. गुप्तचर खात्याने विशिष्ट इनपुट दिले होते. त्या इनपुटच्या आधारे नार्कोटिक्स ब्युरोने काम केल्यामुळे बॉलिवूडचे कनेक्शन उघडकीस आले आहे. हे कनेक्शन वरवरचे नाही. आणखीन बरेच खुलासे होण्याची दाट शक्यता आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबरोबरच अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मत सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत चोक्कर, गोमित चोप्रा या सात जणांना नार्कोटिक्स ब्युरोने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होणे आणि बॉलिवूडमधली नावे बाहेर येणे अपेक्षित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here