नांदेडचे सुपुत्र बीएसएफ जवान संतोष सिदापुरे यांचा अपघाती मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी) : सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र जवान संतोष गंगाधरराव पाटील सिदापुरे (वय ३२) यांचा परेड सरावादरम्यान अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सिदापुरे यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. ०४) सोनखेड (ता. लोहा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिदापुरे यांच्या निधनाने सोनखेड गावासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राजस्थान येथे कर्तव्य बजावत असताना परेड सरावादरम्यान बुलेटवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

जवान सिदापुरे २००९ साली सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते. सिदापुरे यांनी जम्मु काश्मिर, आसाम, राजस्थान येथे कर्तव्य बजावले आहे. सिदापुरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडिल, भाऊ, काका, असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here